तालुका म्हसळा ,जिल्हा रायगड ,हे काय आहे काही माहिती असेल तर कंमेंट करा
.......................................................................
.......................................................................
.......................................................................
अपरिचित इतिहास
याला गोधनगळ धेनूगळ असे म्हणतात,, गाईच्या रक्षणासाठी तो परिसर किंवा ती जमील दान दिल्याचा तो पुरावा आहे ज्याला कुणाला ही जमीन दिली ती चंद्र सूर्य असेपर्यंत त्याकडे राहील आणि तो राष्ट्राचे गोधन यांचे कायम रक्षण करत राहील,,ही स्वामी आज्ञा यात दर्शवली आहे🙏🚩
गद्धेगळ हा वेगळा प्रकार आहे आणि गोधन वेगळा प्रकार आहे,,प्राचीन काळी गाईंच्या रक्षणासाठी असे प्रदेश सुरक्षित राखीव ठेवले जात असत,,,, त्याचे शिल्प हे गावच्या कुरणाच्या ठिकाणी किंवा सीमेवर किंवा गावापासून दूर जंगलात उभे केलेले दिसून येतात,,,,🙏🚩
आपल्याकडे पूर्वी सवत्स धेनू म्हणजेच वासरासह गाय (शक्यतो नुकतीच व्यालेली) दान देण्याची पध्दत होती.काहीवेळा हे दान कुणी, कुणाला, कशासाठी दिले याचा लेख सवत्स धेनूच्या शिल्पासह कोरत असत. या दानाला आक्षेप घेणाऱ्यास काही शिव्या अथवा शापवचनेही लेखाच्या शेवटी असत. सवत्स धेनू देण्यामागे दान घेणाऱ्याला तत्काळ दूध उपलब्ध होऊन शिवाय वासरामुळे पुढे शेतीसाठी बैल अथवा दूधासाठी गायीचा पुढचा वंश चालू राही. हे दान कायमस्वरूपी आहे व सूर्य चंद्र आहेत तोवर राहो अशा अर्थाने वरती सूर्य चंद्र कोरलेले असत. याला आपण सवत्स धेनू दानशिल्प म्हणू शकतो.
हा शिलाहार राजवटी ची खूण आहे...
Comments
Post a Comment