Posts

Showing posts from August, 2020

गधेगळ

Image
एक दिवस आडवाटेवरील भटकंती करत असताना गधेगळ बद्दल माहिती भेटली त्याचा मागोवा घेत थेट बापगाव ला जाण्याचा निर्णय घेतला तस विरगळ आणि गधेगळ याआधी ही पाहिल्या होत्या जसे मुंगी पैठणी या देवीच्या मंदिराबाहेर,अक्षी रस्त्यालगत असणाऱ्या सोमेश्वर मंदिरा च्या बाजूला, बदलापूर मधील शिरगाव, गोप्या घाटातील, डोंबिवली ची गधेगळ तर गोराई कोळीवाडा वाटेवर असणारी तर आता उत्सुकता होती चौधरपाडा बापगाव(पूर्वीचे बोपग्राम) हा शिलालेख चौधरपाड येथे १८८२ मध्ये सापडला . शिलालेखाची उंची ६.१६ फूट,१.४१ फूट रुंदी तर त्याची जाडी ०.८६ फूटाची आहे. शिलालेखाच्या वरच्या बाजूस सूर्य, चंद्र, मंगलकलशाची आकृती कोरलेली असून मधल्या भागात शिलालेख असून हा दांनपत्राच्या रुपात कोरलेला आहे व सर्वात खालच्या भागात गर्दभशापाचे शिल्प आहे.तर हा शिलालेख शिलाहार राजा द्वितीय केशिदेव याने शके संवत ११६१ विकारी सवस्तर, माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री, मंगळवार (२४ जानेवारी १२४०) रोजी घोषित केले. ह्या ७८० वर्षाचा इतिहास लाभलेला बापगाव एकूण पाहता शिलालेख २२ ओळींचा आहे.लेखांची भाषा संस्कृत व नागरी लिपीतील आहे. (वाल्मील कोल्हे) #इतिहासाचे_मुक_साक्षीदार ...

पुरातन अवशेष - ओळख आणि चर्चा

Image
पुरातन अवशेष - ओळख आणि चर्चा Submitted by  वरदा  on 11 February, 2012 - 10:10 एवढ्यातल्या एवढ्यात दोन-तीन प्रचिंच्या बाफवर मंदिरांच्या, मूर्तींच्या अवशेषांबद्दल मला मत विचारण्यात आलं. प्रत्येक वेळा अशा शंका त्या बाफवरून माझ्यापर्यंत किंवा इतर तज्ज्ञांपर्यंत पोचतीलच असं नाही, म्हणून हा नवा बाफ. ज्याला/ जिला एखाद्या प्राचीन/मध्ययुगीन अवशेषांबद्दल माहिती हवी असेल, त्यांनी इथे छोटं प्रचि किंवा त्याचा दुवा डकवावा (यात देऊळ, मूर्ती, शिल्प, नाणी, वीरगळ, शस्त्रास्त्रं, खापरं, लेख, स्थापत्याचे अवशेष असं काहीही येऊ शकतं). मी सर्वज्ञ नक्कीच नाही. मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती मी देईनच, आणि जे मला येत नाही त्याची ओळख पटवणारी इतर लोकं इथे निश्चितच असतील. तेव्हा आपल्या सर्वांच्या (माझ्यासकट) ज्ञानात काहीनाकाही भर पडेलच! त्या निमित्ताने आपण आपल्या आसपास काय सांस्कृतिक वारसा आहे हे थोडंसं सजगपणे पाहू लागलो तरी वारसा संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल पडेल..... शिवाय एका अत्यंत प्राथमिक पातळीवर, थोडंसं विस्कळित का होईना, पण अज्ञात अवशेषांचं एक डॉक्युमेंटेशन सुरू होईल अशी आशा आहे. काही...