गधेगळ

एक दिवस आडवाटेवरील भटकंती करत असताना गधेगळ बद्दल माहिती भेटली त्याचा मागोवा घेत थेट बापगाव ला जाण्याचा निर्णय घेतला तस विरगळ आणि गधेगळ याआधी ही पाहिल्या होत्या जसे मुंगी पैठणी या देवीच्या मंदिराबाहेर,अक्षी रस्त्यालगत असणाऱ्या सोमेश्वर मंदिरा च्या बाजूला, बदलापूर मधील शिरगाव, गोप्या घाटातील, डोंबिवली ची गधेगळ तर गोराई कोळीवाडा वाटेवर असणारी तर आता उत्सुकता होती चौधरपाडा बापगाव(पूर्वीचे बोपग्राम) हा शिलालेख चौधरपाड येथे १८८२ मध्ये सापडला . शिलालेखाची उंची ६.१६ फूट,१.४१ फूट रुंदी तर त्याची जाडी ०.८६ फूटाची आहे. शिलालेखाच्या वरच्या बाजूस सूर्य, चंद्र, मंगलकलशाची आकृती कोरलेली असून मधल्या भागात शिलालेख असून हा दांनपत्राच्या रुपात कोरलेला आहे व सर्वात खालच्या भागात गर्दभशापाचे शिल्प आहे.तर हा शिलालेख शिलाहार राजा द्वितीय केशिदेव याने शके संवत ११६१ विकारी सवस्तर, माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री, मंगळवार (२४ जानेवारी १२४०) रोजी घोषित केले. ह्या ७८० वर्षाचा इतिहास लाभलेला बापगाव एकूण पाहता शिलालेख २२ ओळींचा आहे.लेखांची भाषा संस्कृत व नागरी लिपीतील आहे. (वाल्मील कोल्हे)#इतिहासाचे_मुक_साक्षीदार #सह्याद्रीची_भटकंती#विरगळ #गधेगळ #वाल्मिक कोल्हे#कल्याण#mumbai #kalyan #history #gandhari#maharashtra_clickers #maharashtra_ig
Comments
Post a Comment