वीरगळ व सतीगळ म्हणजे काय ?
वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.
वीरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असे मानले जातात. कर्नाटक राज्यात मोठेमोठे वीरगळ आढळून येतात, त्यातील काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेखकोरलेले वीरगळ तुलनेने कमी आहेत. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड. वीरकल्लू म्हणजे वीरांचा दगड. त्यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा
चित्र १:वीरगळ
चित्र२ :सतिगळ
साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात. वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते. उदा. गाईसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई इ. मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते. सर्वांत वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे, असे दाखवलेले असते.युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते असे यातवून सुचवायचे असावे. काही वीरगळ हे चंद्र सूर्य यांनी अंकित असतात. आकाशात चन्द्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहिली असे यातून सूचित करायचे असावे. काही वीरगळ हे सतीच्या हाताने अंकित असतात. एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी त्याच्यासह सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते.
या स्मारक शिळांवर कोणाचेही नाव नसते. फक्त चित्रे कोरलेली असतात. त्यावरून त्या वीराचे वीरकृत्य समजून येते.काही वीरगळांवर शिलालेखही असतात.
वीरगळ प्रमुख प्रकार दोन -
१) आयताकृती वीरगळ- फक्त समोरुन किंवा ३बाजूने कोरलेली
२) स्तंभ वीरगळ- चारही बाजूने कोरलेली
- उपप्रकार
ज्यामुळे वीरगती मिळाली त्यानुसार वर्गीकरण.
१.वीरबळी वीरगळ-
ही जे वीर राजा युद्धात जिंकावा म्हणून स्वतः स्वतःच्या हाताने शिरच्छेद करुन घेत त्यांची शिळा.
२.गोवर्धन/गोधन वीरगळ-
यादव काळात गोधन हेच श्रेष्ठ धन होते मग त्याची प्राणी वा दुसऱ्या गावाकडूनगोवर्धन/गोधन वीरगळ
३.पशु वीरगळ-
गावावर झालेला वाघ, रानगवे इ पशूंचा हल्ला परतवताना आलेले वीरमरण
४.द्वंद्व वीरगळ-
दोन गावातील तुल्यबळ वीरांचे युद्ध/ कुस्ती यात आलेले वीरमरण
५.डोली वीरगळ-
लग्न विधीत झालेले हल्ले, विघ्न दूर करताना आलेले वीरमरण.
६.गाववली परचक्र युद्ध-
एक वीर अनेकांशी लढताना आलेले वीरमरण
७.अश्वदल/गजदल वीरगळ-
मोठ्या युद्धात आलेले वीरमरण
८.चौर्य वीरगळ-
चोरांचे हल्ले परतवताना आलेले वीरमरण.यात चोरांकडे तलवारी तर ते लढणारे सामान्य असल्याने त्यांच्याकडे काठी असे चित्र कोरलेले असते.
९.साधू/संत वीरगळ-
राक्षसांचे हल्ले परतवताना साधूंना आलेले वीरमरण.
१०.सूर वीरगळ-
या शिलेवर अनेक वाद्य असतात. /एखाद्या कलाकारांचे वीरमरण
११.ताबूत वीरगळ-
विशेष स्मृती असलेल्या शिळा
महाराष्ट्रातील वीरगळ:
- जिल्हा रायगड, तालुका माणगाव येथील उंबरडी गावात शिवमंदिरात ४५ वेगवेगळे वीरगळ आहेत.
- दिवेआगर जवळील देगाव शिवमंदिरातील वीरगळ - यातील एकावर दहा डोकी असलेल्या आणि वीस हात असलेल्या व्यक्तीचे अंकन केलेले आहे.
- मुंबईतील बोरीवली उपनगराजवळ एक्सर गावात नौकायुद्ध चित्रित केलेला वीरगळ आहे.
- आंबेश्वर मंदिर, आंबा गाव
- सातारा जिल्हा-किकली
महाराष्ट्रातील पहिले वीरगळांचे गाव. - नगर जिल्हा-श्रीगोंदा
- रत्नागिरी जिल्हा राजापूर येथे धूतपापेश्वर मंदिरपरिसर
- सिंधुदुर्ग जिल्हा- वाडा येथे विमलश्वर मंदिर परिसर
- मु . पो . कोंढावळे ,तालुका मुळशी ,जिल्हा पुणे.
- महाराष्ट्राच्या सीमेवरील तेलंगणातील मदनूर या गावी ३.५ फिट उंचीचे दोन सतीशीळ आढळतात.. याची माहिती लेखक श्रीपाद राऊतवाड यांनी दिली.
संदर्भ:
दि. २३ जून २०१३ च्या लोकमत, नागपूर मधील पान क्र. १२ वरील लेख. २. https://sahyadrigeographic072017.blogspot.in/
बापट आशुतोष. "इतिहासाचे मूक साक्षीदार - वीरगळ (२२. ६. २०१६)".
भारतीय संस्कृती कोश
डेंगवेकर वृषाली, 'प्र-शिक्षक', ऑक्टोबर २०१७, (ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन)
भोसले द.ता. संंस्कृृतीच्या पाऊलखुणा,पद्मगंंधा प्रकाशन,2013
वीरगळ :-
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावात आढळ्णारे वीरगळ हा खरतर आपला ऐतिहासिक ठेवा आहे पण अती परिचयामुळे एकतर त्याचा शेंदुर फासून देव बनवलेला असतो किंवा दुसरे टोक म्हणजे पायरीचा, कपडे धुण्याचा दगड म्हणूनही वापर केलेला पाहायला मिळतो. पूरातत्व खात्याने केलेल्या औसा, परांडा इत्यादी किल्ल्याच्या डागडूजीमध्ये वीरगळीचे तुकडे तटबंदीत वापरलेले पाहायला मिळतात. शिलाहार काळापासून साधारणपणे सतराव्या शतकापर्यंत वीरगळ बनवण्याची प्रथा चालू होती. वीरगळ ही स्मृती शिळा आहे. युध्दात, गोधनाचे रक्षण करताना, एखाद्या पवित्र कार्यासाठी बलिदान करतांना जर एखाद्याला वीर मरण आले, तर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वीरगळ उभारला जात असे. त्यापासून पुढच्या पिढीलाही आपल्या धर्मासाठी, राजासाठी लढण्याची, बलिदान करण्याची प्रेरणा मिळत असे.
वीरगळ हा आयताकृती दगडावर कोरलेला असतो. या दगडावर १,२,३ किंवा ४ चित्र (शिल्प) चौकटी कोरलेल्या असतात. सर्वात खालच्या चौकटीत ज्या कारणामुळे योध्याला वीर मरण आले ते शिल्पांकीत केलेले असते. यात वीर युध्द करतांना, गोधनाचे रक्षण करतांना, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करताना दाखवलेला असतो. दुसऱ्या चौकटीत तो अप्सरांबरोबर दाखवलेला असतो. याचा अर्थ अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत तो स्वर्गसुख उपभोगत आहे असा होतो. त्यापुढील तिसर्या चौकटीत ब्राम्हण/ साधू पूजा सांगत आहे आणि वीर एकटा किंवा सपत्नी शंकराच्या पिंडीची पूजा करतांना पाहायला मिळतो. याचा अर्थ त्याने केलेल्या पूण्य कर्मामुळे तो देवाशी एकरुप झालेला आहे. त्याला मोक्ष मिळालेला आहे. या चौकटीच्यावर पिंड, मंगल कलश आणि त्याच्या एका बाजूला चंद्र आणि दुसर्या बाजूला सूर्य कोरलेला असतो. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र असे पर्यंत या वीराची किर्ती आसमंतात राहील. पण सत्य परीस्थिती अशी आहे की, वीरगळावर फ़ार कमी प्रमाणात शिलालेख आहेत. त्यामुळे वीरगळ पाहून त्यातील वीर कोण आहे, कुठल्या युध्दात तो कामी आला आणि वीरगळाचा निर्माता कोण आहे हे सांगता येत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. बोरीवलीतील एकसार भागात असलेल्या वीरगळीवर शिलाहार राजा सोमेश्वर आणि यादव राजा महादेव यांच्यात झालेले नौकायुध्द कोरलेले आहे. अशाप्रकारे नौका युध्द कोरलेली महाराष्ट्रातील ही एकमेव वीरगळ आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर असलेल्या मठ गावात असलेल्या सावंतांच्या वीरगळी आहेत त्यावर शिलालेखही कोरलेले आहेत. या शिलालेखात वीरगळींचा उल्लेख भडखांब म्हणून केलेला आहे.
वीरगळींच्या चित्र चौकटींच्या वरच्या भागात कलशा व्यतिरीक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात. वीर कोणत्या धर्माचा (हिंदू, जैन बौध्द), कोणत्या पंथाचा (शैव, वैष्णव इत्यादी) उपपंथाचा असेल त्याप्रमाणे शिल्पांकन बदलत जाते. वीर वैष्णव पंथी असल्यास विष्णू, गाणपत्य पंथीय असल्यास गणपती, बौध्द असल्यास स्तुप पाहायला मिळतो. वीरगळां सारख्याच काही ठिकाणी साधूशिळा पाहायला मिळतात. त्यात पहिल्या चौकटीत साधू ध्यान करत असलेला किंवा आडवा पडलेला दाखवलेला असतो. त्यावरील चौकटीत तो शिवलिंगाची पूजा करतांना दाखवलेला असतो. बहुतेक वीरगळी आयताकृती दगडाच्या एका बाजूला कोरलेल्या असतात. तशाच काही वीरगळी चारही बाजूला कोरलेल्या पाहायला मिळतात. चारी बाजूने कोरीवकाम करण्यासाठी नक्कीच जास्त खर्च येत असणार. त्यामुळे वीराच्या हुद्द्याप्रमाणे ऐपती प्रमाणे (वीर किती सधन आणि मातबर होता) त्याचे वंशज खर्च करुन वीरगळ तयार करत असणार. त्यामुळे काही वीरगळ एकाच बाजूला कोरलेल्या तर काही चारही बाजूंनी कोरलेल्या पाहायला मिळतात. वीरगळीसाठी वापरला जाणारा दगड, त्यावरील कलाकुसर या गोष्टीही खर्चिक असल्याने जवळपास उपलब्ध होणारा दगड वापरुन कमीत कमी कलाकुसर केलेल्या वीरगळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याउलट एकसारच्या वीरगळी राजाने त्याच्या विजया निमित्त उभारल्यामुळे त्यासाठी बाहेरुन आणलेला उत्कृष्ट दगड, त्यावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते.
किल्ले, डोंगर दर्या फ़िरतांना आदिवासी / वनवासी वस्ती, पाड्याजवळ एखाद्या उभ्या लाकडी फ़ळीवर कोरलेले चक्र/फ़ूल त्या खाली कोरलेल्या सुर्य - चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली घोड्यावर बसलेल्या किंवा युध्द करणार्या वीराची प्रतिमा पाहायला मिळते. या असतात आदिवासी वीरांच्या वीरगळी. याशिवाय दगडात कोरलेल्या वीरगळीत घोड्यावर बसलेला योध्दा दाखवलेला असतो. वरच्या बाजूला सूर्य चंद्र कोरलेले असतात. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या सेगवा किल्ल्यावर अशी वीरगळ आपल्याला पाहायला मिळते. गंमतीचा भाग म्हणजे त्यावीराचा पोषाख काठेवाडी पध्दतीचा आहे. नगर जिल्ह्यातील भैरवगड (शिरपुंजे) किल्ल्यावर घोड्यावर बसलेल्या वीराची प्रतिमा कोरलेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या भागात आपल्याला ४ ते ५ फ़ूट उंच वीरगळी पाहायला मिळतात. गुजरातमध्ये अशा प्रकारच्या वीरगळी आहेत. त्यांना पलिया (paliya stone) नावाने ओळखतात. त्याच शैलीचा प्रभाव या नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या भागात असलेल्या वीरगळींवर दिसून येतो.
सतिगळ -
वीरांबरोबर सती जाणार्या स्त्रियांच्या स्मरणार्थ सतीशिळा बनवल्या जात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळ्णार्या सतीशिळांमध्ये स्त्रीचा खांद्यापासून हात चित्रीत केलेला असतो. हा हात कोपरात काटकोनात वळलेला असतो. हातात बांगड्या असतात. हाताखाली दोन प्रतिमा कोरलेल्या असतात. त्या स्त्रीच्या मुलांच्या प्रतिमा असाव्यात. या हाताची रचना आशिर्वाद देणार्या हाताप्रमाणे असते. तसेच सतीशिळा देवळाच्या परिसरात उभारल्या जात असत . त्यामुळे सतीशिळेची शेंदुर लाऊन पूजा केल्याचे बर्याच ठिकाणी पाहायला मिळते. वीरगळी प्रमाणे एक, दोन किंवा तीन शिल्प चौकटीत सतीशिळा कोरलेली असते. त्यात खालच्या चौकटीत चितेवर बसलेली स्त्री, चितेच्या बाजूला उभी असलेली स्त्री किंवा नवर्याच डोक मांडीवर ठेऊन चितेवर बसलेली स्त्री, वाघावर , घोड्यावर बसलेली स्त्री कोरलेली असते. दुसर्या चौकटीत नवरा बायको हातात हात घालून उभे राहीलेले दाखवलेले असतात. पहिल्या किंवा दुसर्या चौकटीत उजव्या बाजूला सतीचा कोपरापासूनचा हात दाखवलेला असतो. तिसर्या चौकटीत नवरा बायको पिंडीची पूजा करतांना दाखवलेले असतात. त्यावर सूर्य चंद्र कोरलेले असतात. वीराबरोबर त्याच्या दोन किंवा तीन पत्नी सती जात असत. त्यांचे प्रतिक म्हणून कोपरात वाकवलेले दोन किंवा तीन हात दाखवलेले असतात. काही वीरगळामध्ये वीराची पत्नी आणि सतीचा हातही दाखवलेला असतो. त्याला वीरसतीगळ असे म्हणतात. ही वीराची आणि सती या दोघांची एकच स्मृतीशिळा असते.

सौजन्य - गूगल
Comments
Post a Comment